होतास दुःखितांचा
होतास दुःखतांचा सन्मित्र सोबती तू
गेलास देऊनिया दलितास प्रेरणा तू ! ॥ धृ ॥
ज्यांना गुलाम म्हणुनी गरिबित वाढविले
अस्पुश्यता रूढींच्या चरकात गजविले
त्या मूक बांधवांची पुचलीस लोचने तू ! ॥ १ ॥
माणूस माणसाला रे तुच्छ लेखातांना
तू पहिलेस येथे ते भेदभाव नाना
अन्याय पहुनिया जाळलास अंतरी तू ॥ २ ॥
जनतेत निर्मिलास तू सार्थ स्वाभिमान
विश्वात शोशितांची केलास उंच मान
जीविताशा त्यांच्यात त्यांच्यात निर्मिल्यास तू ! ॥ ३ ॥
वर्णाश्रमास इथल्या देऊन मुठमाती
त्या धर्मकल्पनांच्या तू तोडल्यास भिंती
जनता जनार्दनांना सन्मार्ग दाविला तू ! ॥ ४ ॥
-- रंगराज लांजेवार