Saturday, 30 May 2015

होतास दुःखितांचा

होतास  दुःखतांचा  सन्मित्र  सोबती तू
गेलास देऊनिया दलितास प्रेरणा  तू  !    ॥ धृ ॥

ज्यांना गुलाम  म्हणुनी गरिबित वाढविले
अस्पुश्यता रूढींच्या चरकात गजविले
त्या मूक बांधवांची पुचलीस  लोचने  तू !  ॥ १  ॥

माणूस माणसाला  रे तुच्छ लेखातांना
तू पहिलेस येथे ते भेदभाव  नाना
अन्याय पहुनिया जाळलास अंतरी तू      ॥ २ ॥

जनतेत निर्मिलास तू सार्थ स्वाभिमान
विश्वात शोशितांची केलास  उंच  मान
 जीविताशा त्यांच्यात त्यांच्यात निर्मिल्यास  तू ! ॥ ३  ॥

वर्णाश्रमास इथल्या  देऊन  मुठमाती
त्या धर्मकल्पनांच्या तू तोडल्यास भिंती
जनता जनार्दनांना सन्मार्ग दाविला तू  ! ॥ ४ ॥
                                     -- रंगराज  लांजेवार 
                                                   



No comments:

Post a Comment